मैदानात उतरलो की विजय आपलाच असतो!
सांदिपनी टेक्निकल कॅम्पस, कोलपा, लातूर येथील विद्यार्थिनींनी IEDSSA झोनल स्पर्धेत आपल्या खेळाचा दमदार जलवा दाखवला. दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या या स्पर्धेत सांदिपनीच्या वाघिणींनी व्हॉलीबॉलमध्ये प्रथम क्रमांक (Winner) पटकावला, तर कबड्डीमध्ये उपविजेतेपद (Runner-Up) मिळवून कॉलेजचे नाव अभिमानाने उंचावले. विद्यार्थिनींच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे संस्थेच्या क्रीडा परंपरेला नवा गौरव प्राप्त झाला आहे.



