दिनांक : ०७/०७/२०२६
ठिकाण: संदीपानी टेक्निकल कॅम्पस, फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, कोलपा, लातूर
विषय: वन महोत्सव निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम
कार्यक्रम समन्वयक`: प्रा. दिवटे आर.व्ही . आणि प्रा.मोरे एन .बी.
प्राचार्य: डॉ. कुलकर्णी एस.बी.
इमेल : principal@sandipani.ac.in
मोबाइल: ७०५७९०८०५६
शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत “वन महोत्सव” साजरा करण्याच्या निमित्ताने संदीपानी टेक्निकल कॅम्पस, फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, कोलपा, लातूर येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आपणा सवानाच आज वातावरणीय बदलाचे परिणाम जाणवत आहेत. त्यामध्ये तापमानात वाढ, पाणी टंचाई, वायु प्रदुषण, जैव विविधदेत्ते चा ‘हास यासारख्या गंभीर समस्सेचा परिणाम झाला असून इतकेच नव्हे तर शेती/कृषी क्षेत्रावर सुध्दा प्रतिकूल परिणाम होण्याचे भविष्यात संकेत मिळत आहेत. या सर्व समस्यांवर वर उपाय म्हणून वृक्षरोपण व संवर्धन याबाबत चे महत्त्व विद्यर्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले
या उपक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमात NSS स्वयंसेवक विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग तसेच इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी उत्साहाने सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
कार्यक्रमादरम्यान वृक्षांचे महत्त्व, पर्यावरण संरक्षण आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वातावरण निर्माण करण्याची गरज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारीही स्वीकारली.
हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला असून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यास मदत झाली. भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करून पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देण्याचा संकल्प करण्यात आला.
कार्यक्रम समन्वयक`
राष्ट्रीय सेवा योजना (NSS)
संदीपानी टेक्निकल कॅम्पस, कोलपा, लातूर
