दिनांक : 13/08/2026
ठिकाण : सांदिपनी टेक्निकल कॅम्पस, फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, कोळपा, लातूर
विषय : स्वच्छता पखवाडा – 2026 कार्यक्रम
कार्यक्रम समन्वयक : प्रा. दिवटे आर. व्ही. व प्रा. मोरे एन. बी.
प्राचार्य : डॉ. एस. बी. कुलकर्णी (इंजिनिअरिंग) व प्रा. एस. एन. वाकडे (पॉलिटेक्निक)
ई-मेल : principal@sandipani.ac.in
मोबाईल क्र. : 7057908056
संदर्भ : महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई
पत्रक्रमांक : रासेयो-2026/ प्र.क्र. 67/ रासेयो कक्ष
दिनांक : 29 जुलै, 2026
महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या वरील संदर्भित पत्रानुसार दिनांक 1 ते 15 ऑगस्ट, 2026 या कालावधीत “स्वच्छता पखवाडा – 2026” हा उपक्रम सांदिपनी टेक्निकल कॅम्पस, फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, कोळपा, लातूर येथे उत्साहात व यशस्वीपणे राबविण्यात आला.
या पखवाड्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे, पर्यावरण संरक्षणाची जाणीव वाढवणे व समाजामध्ये स्वच्छतेचा संदेश पोहोचवणे हा होता.
दिनांक13ऑगस्ट 2026 रोजी “स्वच्छता शपथ” घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांनी स्वच्छता राखण्याची प्रतिज्ञा घेतली.
पखवाड्यादरम्यान महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय तसेच परिसरातील रस्ते स्वच्छ करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
“प्लास्टिक मुक्त परिसर” या विषयावर विशेष जनजागृती करण्यात आली. तसेच कचरा व्यवस्थापन व ओला-सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता व सामाजिक जाणीव वाढीस लागली.
दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी स्वच्छता पखवाड्याचा समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. कुलकर्णी (इंजिनिअरिंग) व प्राचार्य प्रा. एस. एन. वाकडे (पॉलिटेक्निक) तसेच प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम अधिक प्रभावीपणे पार पडला.
अशा प्रकारे “स्वच्छता पखवाडा – 2026” हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला व विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला.



