दिनांक : 23/09/2026
ठिकाण : खरोसा, ता. लातूर, जि. लातूर
विषय : खरोसा येथील लेणी व मंदिर परिसर स्वच्छता अभियान
कार्यक्रम समन्वयक : प्रा. दिवटे आर. व्ही. आणि प्रा. मोरे एन. बी.
प्राचार्य : डॉ. कुलकर्णी एस. बी.
ई–मेल : principal@sandipani.ac.in
मोबाईल : ७०५७९०८०५६
राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत सामाजिक बांधिलकी, स्वच्छता आणि ऐतिहासिक वारशाचे संवर्धन या उद्देशाने खरोसा येथील प्रसिद्ध लेणी व मंदिर परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले.
या अभियानामध्ये संदीपानी टेक्निकल कॅम्पस, फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, कोलपा, लातूर येथील NSS स्वयंसेवक विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. स्वयंसेवकांनी लेणी व मंदिर परिसराची स्वच्छता करून परिसरातील कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या व इतर अनावश्यक वस्तू गोळा करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली.
या उपक्रमादरम्यान स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे तसेच ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. परिसर स्वच्छ ठेवणे, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे याबाबत जनजागृती करण्यात आली.
NSS स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन “स्वच्छ परिसर – सुंदर परिसर” तसेच ऐतिहासिक वारशाचे संरक्षण हा संदेश दिला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, स्वच्छतेची जाणीव आणि ऐतिहासिक वारशाबद्दल आदर निर्माण होण्यास मदत झाली. हा स्वच्छता अभियान उपक्रम यशस्वीपणे पार पडला. भविष्यातही NSS च्या माध्यमातून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सामाजिक जागृती आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला.


